वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या अंगाच्या, काही माझ्या, काही मला आवडलेल्या कविता आणि लेख...... कदाचित तुम्हालाही आवडतील...
माझी ब्लॉग सूची
मंगळवार, २० डिसेंबर, २०११
रविवार, १८ डिसेंबर, २०११
ए….तू रागाऊ नकोस रे…
कवितेला तुझ्या प्रत्येक
सुंदर,छान,अप्रतिम,तुफान..
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच…..विचार ना का????
वाटत तुझ्या शब्दाणी खूप खूप बोलाव
गूढ-गूढ,खोल खोल आशय घन असाव
रथी-महारथीच्या बरोबरीला तू याव
आणि मग तुला कोणी स्पर्धकच ना उराव.
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???
वाटत तुझ्या कवीतानी खूप भरारी घ्यावी
वेगवेगळ्या विषयांची त्याला छान झालर असावी
कवितेची प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावी
उगाच त्याच त्याच विषयांची नेहमी गर्दी नसावी
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……..विचार ना का?????
वाटता माझी टीका तू खूप मनावर घ्यावी
आणि एक-एक रत्न तुझ्या लेखणीतून बाहेर पडावि
तुझ्या कविता ह्या प्रान्तातल्या शेवटचा शबद ठरावा
तुझ्या नंतर तुझ्या कविता अनमोल होऊन उराव्या
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???
वाटत व्हाव विराजमान तू प्रसिद्धीच्या शिखरावर
अस्सल प्रतिभा खणखनावी तुझ्या प्रत्येक कवितेतून
पाहीन मी ईथुन तुला यशाच्या खुर्चिवर
अश्रू असतील डोळ्यात माझ्या आनंदाचे भरभरून
मग होऊ ना मी टीकाकार तुझी…
ए……..तू रागाऊ नकोस रे
मंगळवार, ६ डिसेंबर, २०११
"जीवन कळले नाही ग"
मला पाहुनी हसतो आहे मृत्यु माझ्या दारी ग
कशी चुकविली मल्हाराची या विठुने वारी ग.
...
जगान्याच्याही पलीकडून तो देतो आहे ग्वाही ग
भकास जीवन संपेल तेव्हा जन्मणार मी नाही ग.
जीवन कळले नाही ग ..
झाडे ,सूर्य, नदी अजूनही येते उगवते वाहते ग
अंतरातुन आवाज आता त्यांचा कोणी पाहते ग.
धमन्या मधुनी वाहत जाते रंग तरंग काही ग
कालोखाच्या या पटलावर चंद्र अजूनही नाही ग .
जीवन कळले नाही ग ...
सोमवार, ५ डिसेंबर, २०११
आभास हा, आभास हा......
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू गं मी स्वतः
... दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे
पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते उगीच लाजते
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते
तुझ्याच साठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्ना का हे जगताना मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
मनात माझ्या हजार शंका
तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस
आहेस खरा कसा रे
तू इथेच बस ना हळूच हस ना
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मला हि अजुनी
तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
आठवणी............
बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
... काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......
काहींना लागलेला गंज
... तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....
काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......
जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....
किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात...
गुरुवार, १ डिसेंबर, २०११
पाहू गं किती वाट.....
बरीच रात्र झाली काय करु आतां? भयाण काळोख चहूकडे पसरलायं. पुस्तक टाकलं, गादीवर पडले. पण छे! नाही गं चैन तुझ्याशिवाय. लवकर ये ना! मनाला किती समजावून सांगितलं किं- वाट पाहू नको, पण कसे होणार? तुझ्याविणा कसतरी होतयं. कंटाळून शेवटी जांभया येताहेत. अरेच्चा......! यायला लागलीस तु? तरीचं म्हटलं. जांभया कशा आल्या. दूतांना पुढे पाठवलं वाटतं! बरं! चला तूंहि आलीस. आत पुस्तक नको.दीवा नको. झोपलेलं बरं! उद्याच उद्या. झोप आली हं..!
जीवन म्हणजे तडजोड....
कुणी म्हणतात-जीवन हा संग्राम आहे. संग्राम हा नाही कुठे? साधी वस्तू विकत घेतानासुद्धा लोक संग्रामाच्या तयारीने जातात. एक शेजारीण दुसरीशी बोलताना वाकयुद्धाच्या सामुग्रीनिशी हल्ला करते. अशा युद्ध प्रव्रुत्तीने तुडूंब भरलेल्या लोकांना हवे तर म्हणू देत. "-जीवन हा संग्राम आहे!" जीवनात संग्रामातील क्रौर्य दिसणार नाही. युद्धातील रक्तपात येथे दिसणार नाही. क्रौर्याऐवजी निसर्गाची ममता आणि रक्ताच्या लाल रंगाऐवजी अरुणोदयाचा लाल रंगच निसर्गाला जास्त प्रिय आहे. निसर्ग वस्तू निर्माण करतो. काळ वाईट गोष्टी हिरावुन घेतो. अशा तर्हेने निसर्ग आणि काळ यांची नेहमीच तडजोड चाललेली असते. काळ सांगतो "-निसर्गा, नको रे असल्या गोष्टी." निसर्ग मात्र आपला बालहट्ट चालुच ठेवतो. पण काळ त्याला दूर भविष्याकडे बोट दाखवतो. व त्याला खेळायला पाठवून देतो, व त्याच्या जवळील वाईट गोष्टी आपण काढून घेतो, जसे-आई.. आई मुलाच्या हातातील काठी वगैरॆ काढून घेते. निसर्ग आणि काळ जर तडजोड करतात. तर मग निसर्गाच्या प्रशांत मांडीवर खेळणार्या आपल्या जीवनाला तडजोडींचे महत्व नाही काय?
निसर्गाने निर्माण केलेल्या मानवाचे जगणे म्हणजेच जीवन. जीवनसागरात होडी हाकारली की सुकाणू कोणत्या दिशेने फिरवावा याचा विचार माणूस करु लागतो. मार्गात त्याला व्यवहाराचे खडक लागतात. आपली नौका तेथे आपटून फूटू नये, म्हणून त्यांना वळसा घालुन घालुन जावे लागते. पाण्याचा वेग वाढला कि आपली होडी तीरावर आणून थोडावेळ थांबावे लागते. संसाराच्या रखरखीत जागेत प्रेमाचे व्रुक्ष लावून सावली निर्माण केली जाते. थंडीने काकडल्या जाणार्या देहाला लोकरीची वेश्रुणे घातली जातात. ही सगळी तडजोड नव्हे काय? भूक लागली कि जेवणे तहान लागली कि पाणी पिणे. या साध्या गोष्टीतून सूद्धा तडजोडचं प्रगट होत नाहे काय?
मनुष्य म्हणेल-" भूक लागली तरी मी जेवणार नाही." पोट म्हणेल- "बरं! मीही आपले काम करणार नाही, काम बंद ठेवीन."संपले! सुरू झाला झगडा.. अशा संग्रामाने जीवन जगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागते.. रोजचा व्यवहार घ्या. पाच मिनीटांचा मार्ग. बसमधुन जाताना आपण स्वतः बसलेल्या असतो. व एखादी बाई लहान मुलाला घेऊन बसमध्ये चढते. अशावेळी तिला जागा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नाहीतर तीने जागा द्या म्हणावे आणि आपण भांडावे, नाही म्हणावें. हा संग्राम करण्यापेक्षा तडजोड करुन माणूसकीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर नाही काय? अशा तर्हेने आई-मूल, नवरा-बायको, भावंडे इ. आसपासचे लोक, प्रत्येक प्राणी, व्यवहार यांच्याशी तडजोड न करताच जगणे अशक्य आहे. संग्राम हा जीवनातील थोडासा भाग होवू शकेल पण जीवन नव्हे. संग्राम जीवनाचा थोडा भाग असेल पण तडजोड म्हणजेच पुर्ण जीवन!
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११
स्वप्नांची परीक्रमा…
सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….
बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??
कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!
मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
नावात काय आहे?
नावात काय आहे असे म्हणतो ना आपण
नावात काय आहे?
मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?
कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन
नेत्याने पक्ष बदलला की लगेच
कार्यकर्ते पक्ष बदलतात
त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते
हीच का २१ वी सदी?
नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
ते आमचे भविष्य काय घडवणार?
मतांसाठी खेळ सारा हा
मतदार राजा आता तरी जागा हो
योग्य ते सरकार निवड
आणि मराठ्यांचे भविष्य घडव
जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे
जय महाराष्ट्र ............. ......... ....
माज्या बा चा बा..........
माज्या बा चा बा
व्हता माणुस लई येगळा
पटका लाल डोई वरती
अंगी डगला व्हता ढगळा....
... माजा बा जवा मला
सांगी त्याची ही कहाणी
मनात होई चर चर..
होई काळजाच पाणी पाणी...
जीवाभावाची त्याची सोबतीण
असायची नेहमीच आजारी....
पण ह्यो गडी व्हता लई भारी
एकट्यानच पोसली...दोन पोरं चार पोरी..
व्हता नावावर त्याच्या
एक तुकडा भुई चा
होती कूस तिची वांझोटी
न दिसे कण गवताचा
राबून दिसभर....दुसऱ्याच्या शेती
घरी येई हा घेउन..घामी भिजलेला पैका
ठेवी एक एक आणं, एका एका हाती
मागे बदल्यात त्याच्या..गालावरी एक मुका...
राती निजल्यावर माजा बा
ठेवी हात त्याच्या डोई वर
बोली आपल्याच मनाशी
"माजा ल्योक, व्हईल मोटा हाफिसर "
झाला हैराण.... केलं साऱ्या जीवाचं एक रानं
ठेवून स्वतःला गहाण ...जोडले दोन पैके यानं हाती
दुसऱ्याच दिशी .....भल्या रामाचिया पारी ....
सोडून आला माज्या बा ला ...दूर शाळंच्या दारी
माज्या बा न ही मग... धरला एकच तो ध्यास
करून दाखवेन सार्थ ....त्याच्या बा चा विश्वास
केल प्रयत्न अथक ...मिळविला फस्क्लास.... (फर्स्ट क्लास)
सांगाया गेला गावी ...बातमी ही ख़ास...
ऐकून पोराचा निकाल...डोळं झाली त्याची लाल
उलट्या हातानं पुसताना डोळे...
माज्या बा न बघितली...त्याच्या तळहातावरली फोड़े
नाही रडला माजा बाप... दाबून हुंदका आतल्या आत
गेला परत तो शाळंत... बांधून मनाशी खुणगाठं
काही वरसानी माजा बा... मोटा हाफिसर जाला...
बाप तवा त्याचा...व्हता खिळला बाजंला
जवा ऐकली त्यानं...बातमी ही लाख मोलाची..
धडपडला बाजंतुन...निघाला टेकवित काठी...
पुसता माज्या बा नं..बोलला माघारी वळून..
चाललो फेडाया नवस..केला होता तुज्यासाठी...
तवा मातर माजा बा...रडला डोळे भरून....
माझ्या आजोबाच्या फोटुवरील हारातल्या झेंडू प्रमाणं
आज बी माझ्या बा च्या डोळ्यातलं पाणी ताजंच व्हतं.....
बुधवार, २ नोव्हेंबर, २०११
करून करून काळजी माझी...........
करून करून काळजी माझी करून करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा झोप जरा गाढ !!
मागणार नाही उगाच खाऊ मागणार नाही खेळ
लवकर उठीन आवरायला लावणार नाही वेळ
शाळेमध्ये जाईन रोज सगळा डबा खाईन
अभ्यास करीन, टीव्हीसुद्धा थोड्याच वेळ पाहीन
देवापुढे लावीन दिवा, जेवण करीन मस्त
वरण भात भाजी चटणी सगळ करीन फस्त
शेपुचीही भाजी सांगेन आई दोनदा वाढ !!
वागणार नाही वाईट काही राखेन तुमच नाव
माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव
लवकर लवकर शिकीन आणि लवकर मोठ्ठा होईन
बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन
वणवण करतो बाबा त्याचे करीन थोडे काम
दमला तोही त्याला आता मिळूदे आराम
ना..ना ना न ना.. ना.. ना.. ना.. ना..
घट्ट मीटा डोळे तुम्हा कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझ मऊ पांघरूण देतो
झालो आता मोठा सांगा छळेल तुम्हा कोणं?
आई-बाबा तुम्ही आता मुलं माझी दोन
पाहू नका आता असे नाते झाले नवे
मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे
का रे बाबा मिशीमध्ये हसतोस असा?
आई बघा रडू लागे डोळे तिचे पुसा
हात जोडे आई, बाबा म्हणतो लबाड !
करून करून काळजी माझी करून करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा झोप जरा गाढ !!
बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११
पाहू गं किती वाट.....
आठ वाजले, नऊ वाजले, दहा वाजले. छे! अकरा बारासुद्धा वाजले, तु का गं आली नाहीस? तू रोज येणारी. तुझी ठरलेली वेळ. चोर पावलांनी येऊन हळूच डोळे झाकणारी तू. अद्यापि का बरं आली नाहीस? तू अशा रात्रीच्यावेळी मला एकटीला सोडून कां बरं गेलीस? तू ये. मला चैन पडणार नाही तुझ्याशिवाय. मी अंथरुण घातलं, पासोडी ठेवली. वाट पाहता पाहता कंटाळून पुस्तक वाचणं सुरू केलं. पण तुझा पत्ता नाहीं.
बरीच रात्र झाली काय करु आतां? भयाण काळोख चहूकडे पसरलायं. पुस्तक टाकलं, गादीवर पडले. पण छे! नाही गं चैन तुझ्याशिवाय. लवकर ये ना! मनाला किती समजावून सांगितलं किं- वाट पाहू नको, पण कसे होणार? तुझ्याविणा कसतरी होतयं. कंटाळून शेवटी जांभया येताहेत. अरेच्चा......! यायला लागलीस तु? तरीचं म्हटलं. जांभया कशा आल्या. दूतांना पुढे पाठवलं वाटतं! बरं! चला तूंहि आलीस. आत पुस्तक नको.दीवा नको. झोपलेलं बरं! उद्याच उद्या. झोप आली हं..!
२३ ऑगस्ट य़ा जागतिक गुलामगिरी निर्मूलन स्म्रुतीदिनानिमित्त...
.
माना झुकलेले
सगळेच चेहरे म्लान,
जणू ओझ्यानं
थकलेले गुलाम....
होय,
आपण सर्वच
गुलाम,
नसानसात
भिनलेल्या दुबळ्या अवस्थांचे,
संघर्षांचे....
बेगडी जगाला
भुललेलं
आपलं मन
अनंत गरजांचं गुलाम...
स्वावलंबनाचा
झेंडा घेऊन
धडपडताना
आधाराची कुबडी
हातात येते तेंव्हा,
अवस्था,
जाळ्यात अडकलेल्या
फडफडणार्या
पाखरासारखी.....
पंख छाटलेली
ही गुलामी किती काळ
अंधारलेल्या वाटेवर
रेंगाळत राहणार?....
स्वत्वातून शून्यातलं विश्व
साधता येतं,
सत्यातून संघर्षाच बीज
रोवता येतं,
आत्मविश्वास
आत्म्याची ज्योत आहे
गुलामीचा काळोख
हटविण्यासाठी.
मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११
स्पंदन
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११
बाप
मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११
शांतीचा शोध
रविवार, ११ सप्टेंबर, २०११
श्रीगिरिजात्मजाची कथा
आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन, तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्र रूपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र व सुंदर शरीर होते.
गिरिजात्मज गणेशाने १२ वर्षे या क्षेत्रात तप केले. अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गणेशाचा 'मयुरेश्वर' अवतार झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.
लेण्याद्री
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११
श्रीविघ्नेश्वराची कथा
फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले. ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारदमुनींकडून समजली. तो घाबरला. त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्याच क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्राने आज्ञा केली, 'अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर.' त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठेच संकट आले. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्या वेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला. 'मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो' असे त्याने देवांना आश्वासन दिले.
मग गजाननाने पाराशरपुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, 'ज्या ठिकाणी माझे भजन-पूजन-कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये.' मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, 'तुमच्या नावामागे माझे नाव असावे. 'विघ्नहर' किंवा 'विघ्नेश्वर' असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.' तथास्तु' असे म्हणून गजानन म्हणाला, ''मी आजपासून 'विघ्नेश्वर' झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे. 'विघ्नेश्वर' या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.''
अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला; म्हणून गजाननास 'विघ्नेश्वर'' किंवा 'विघ्नहर' असे नाव या स्थानी प्राप्त झाले. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैरुत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली. हाच तो ओझरचा 'श्री विघ्नेश्वर विनायक' .
ओझर
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.
कळळेच नाही
जगत होते आनंदी जीवन
प्रेम कधी झाले कळलेच नाही
प्रेम मनापासून करत होते
नाते कधी जुळले कळलेच नाही
नात्यांचा पुर्णपणे स्विकार केला
बालपण केंव्हा संपले कळलेच नाही
कर्तव्याचा भार मनावर पडला
स्वतःच्या इच्छा कधी कळल्याच नाही
जुने नाते थोदे दुर गेले
अश्रु कधी आले कळलेच नाही
माहेरच्या आठवणी विसरुन थोडया
संसारात कधी रमले कळलेच नाही
रेवती किर्तनकार, परभणी
कळळेच नाही
जगत होते आनंदी जीवन
प्रेम कधी झाले कळलेच नाही
प्रेम मनापासून करत होते
नाते कधी जुळले कळलेच नाही
नात्यांचा पुर्णपणे स्विकार केला
बालपण केंव्हा संपले कळलेच नाही
कर्तव्याचा भार मनावर पडला
स्वतःच्या इच्छा कधी कळल्याच नाही
जुने नाते थोदे दुर गेले
अश्रु कधी आले कळलेच नाही
माहेरच्या आठवणी विसरुन थोडया
संसारात कधी रमले कळलेच नाही
रेवती किर्तनकार, परभणी
श्रीमहागणपतीची कथा
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारीवदे महागणपती असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

