माझी ब्लॉग सूची

रविवार, २० जून, २०१०

पाऊस बहुरूपी

पाऊस मुंबईचा
जेव्हा लागतो पडायला
इथल्या माणसासारखाच त्याला
वेळ नसतो 'थाम्बायाला'!

पाऊस दिल्लीचा
"भाषण" ऐकून झालाय 'ठग'
आणतो अवसान ' महापुराच'
नि जमतात नुसतेच 'ढग'!

पाऊस काश्मीरचा
'बर्फ' होउन' थिजला
इथल्या दहशातिला
तो बापडाही भ्याला!

बंगलूरच्या पावसाचा
निरालाच 'ट्रेंड'
पाचच दिवस पडीन, म्हणतो
'आय डोंट वर्क ऑन वीकेंड'!!

पाऊस पुण्याचा
भलताच 'चेष्टेखोर'
'ती' ला भेटायला पडाव बाहेर
तर धरतो लगेच जोर !

पाऊस पंढरीचा
पडतो 'अभंग'
जसे विठ्ठलाच्या कीर्तनी
वारकरी दंग!

असा पाऊस 'बहुरूपी'
वाटे सर्वाना आपला
हां जिथे जिथे पडतो
होउन जातो तिथला!

सोमवार, ७ जून, २०१०

विजयोत्सवाबरोबरच.......

"स्वतंत्र होताना भारत दुभंगला, म्हणून नाराज होऊ नका. आज तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र झाला म्हणून पंधरा ऑगस्टला जरूर विजयोत्सव करा. आज तर तुमच्या हातात हजार वर्षात कधी नव्हता, एवढा विस्तीर्ण प्रदेश झाला आहे. उरलेल्या एक चतुर्थांश भागाला आपण का म्हणून भ्यावे? जमेच्या बाजूला स्वातंत्र्य प्राप्तीचा बंदा रुपया आहे. मग दोष-उणिवांची चिल्लर खर्चाच्या बाजूला किती का असेना! आम्ही एक वेळ अर्धी भाकरी खाऊन त्राण जगवू. पण मिळालेले स्वातंत्र्य कधीही गमावणार नाही. स्वातंत्र्य आले म्हणून एकदम सुधारणा होणार नाही, कोणत्याही पक्षाला ती आणता येणार नाही. आपण परकीयाविरुध्द जी साधने वापरली. त्यांची आता आवश्यकता उरली नाही. मतभेद झाले तरी ते मतदानाच्या पेटीतूनच सोडवले पाहिजेत."
स्वा. सावरकर