माझी ब्लॉग सूची

बुधवार, २९ जुलै, २००९

तुझ्या सवे जे जे क्षण जगले
आनंदाने सदैव हसले
रुसले, फुगले ,कधी हिरमुसले
तरीही तुझ्याच विश्वात रंगले

मंगळवार, २८ जुलै, २००९

चारोळ्या



माझ्या मनाच्या एकाकोपर्यात तुझच चित्र लपलय

ते माझ नाही माहीत आहे पण, मी जीवापाड जपलय.......
पूजा

गुरुवार, २३ जुलै, २००९

आई!

आई!

आई! आई या शब्दात सगळविश्व सामावालेल असत
तिच्या मायेच्या कुशीत पिलाने सार कही कमावालेल असत
आईच्या वत्सल्यादायी डोळ्यात
उज्जवल भविष्याच स्वप्न पहायच असत
तिच्याच आशिर्वादाने स्वप्नाना वास्तवात आणायच असत
आईच्या हृदय मंदिरात कायम पुजारी बनुन रहायच असत
तिच्या मूर्तिमंत चेहरयात परमेश्वर दर्शन करायच असत

काहीना नसते आई....
काहीना नसते आई पण .....,
वाईट वाटुन घ्यायच नसत
ही तर दैवाने दिलेली संधी आहे
कारण आईला फक्त अनुभवायच असत .