चाल हवी स्वर हवा
गीत एखादे गाताना
जीद्द हवी उर्मी हवी
हे सुंदर जीवन जगताना
रस्त्याकडेची झाड
बिचारी निरागस उभीच असतात
कोण आला कोण गेला
मग एक दुसर्याला विचारत बसतात.
आठवतय ?
आपण पाना फुलांवरच दव पहायचो!
आणि त्या दवाच्या थेम्बातच परस्परांना न्याहालालायाचो
दिवस धळत होता
संध्याकाळ आपले पाय पसरत होती
आणि तुझी आठवण चोरपावलानी माझ्यात शिरकाव करत होती.
एकेकदा वाटत अस
स्वताला कवितेत पूर्ण पणे वर्णनाव,
पण जगासमोर स्वताला मांडून
आपण तरी आपल्यात कितपत उराव