माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

मनात माझ्या-

मनात माझ्या भलते नाही विचार जा त्या वार्याला
मेघाआडुनी लुकलुक नार्या चुघलखोर त्या तार्याला.
सौधावर मी उभी राहते
अस्तकालचे नवल पाहते
कुणी खुणावत खाली येते
क्षणात वळते मी माघारी दडते आत निवार्याला.
कधी नदीवर भरता पाणी
पैलतटावर गाते कोणी
अर्धा मूर्धा घडा भरोनी
तशीच येते घाटावर मी चारजणींच्या थार्याला.
आत्ममग्न मी कधी एकांती
नगर शिवेवर मार्गावारती
धुळीत कुसुमे अवचित पड़ती
स्पर्श न करते कधीही मी त्या गंधित मृदुल निखार्याला.
गवाक्षातुनी पहाटकाली
बघता, हलती दूर मशाली
मालवुनी मी दिवे महाली
कालोखाचे उत्तर देते त्या खात्धीत इशार्याला .
हे मतवाले स्वैरप्रवासी
लौकिक नीति नसे अशासी
भोग घडीचा मग सन्यासी
कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पार्याला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा