माझी ब्लॉग सूची

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

आनंदाची फुलबाग

ही बाग रसिक हो! आनंदाची फुलली,
जा फिरा, लुटा रस, इच्छा जरि मनि असली.
कित्येक सन्मती मधुर गंध सेवोनी
आनंदे डुलती, भूलति भान हरपोनी.
ज्या बाग बोललो परी मानवी नाच ती;
मग तिथे कोठली रम्य, नेटकी रीति?
ईश्वरी कृपेची लीला जी चौफेर,
हे तिचेच दर्शन एक आत बाहेर.
वनसृष्टीमंदिरी कुठली नीटस शोभा ?
त्या ताजमहाली सौंदर्याचा गाभा.
मृदू जातीसन्नीध शिला कठीण हृदयाची,
ठाउकेच सकलां, ऐशी रचना वनिंची.
लेखितो रसिक कुणी नीरस त्या विपिनाला,
परी तिथेच दिसते खरी हरीची लीला.
निर्वेध मनाने करुनी आंत प्रवेश,
सच्छील लोचने पहा गीत्वान देश.
कुणी प्रवेशद्वारी वानितील. हंसतील:
व्हा बधिर, अंध तई वृति ठेवुनी अचल.
मन रामो, न अथवा: तरि न दोष कवणाला;
रुची भिन्न जगाची ठावे आनंदाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा