माझी ब्लॉग सूची

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

शब्द

शब्द : सांगणारा
शब्द : थांबणारा-अहेतुक, सहेतुकही!
शब्द : प्रपातासारखा अस्खलित, अनावर
शब्द : घनगर्द कुंजासारखा चाहुल न देणारा
आतल्या एकांताची
शब्द : रथयात्रेत बेहोष घोंगावणारा
शब्द : उजळणारा लावताना सांजवात
तुळशीपाशी...
नवल एक : शब्दांची वाटणी इतकी विषम कशी
तुझ्या माझ्यात?
नवल दोन : तुझे-माझे मौन मात्र एकरूप,
आस्वादक
फुलानेच फुलाचा वास घ्यावा, तसे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा