हिरव्यागार नक्षीने नटलेली अवनी... गवताची हिरवी हिरवी पाती... त्या पात्यावरुन परावर्तित होणारी सूर्यकिरणे... आकाशात झेपावणार्या शुभ्र बगळ्याच्या माळा... भिरभिरणारी फुलपाखरे... आणि क्षणात कोसळणारा क्षणात नाहीसा होणारा ऊन पावसाचा खेळ... श्रावणातील हे हळवे वातावरण आसमंतात दरवलून राहते.
अगदी लहानपणापासूनच आपण श्रावण अनुभवत आलो आहे. मात्र बालकवींच्या
" श्रावंमासी हर्ष मानसी हिरवल डेट चोहिकडे
क्षणात येते सरसर शिडवेक्षणात फिरुनी ऊन पडे..."
या कवितेतील श्रावण वेगलीच अनुभूती देवून जातो. अनेकदा आपल्याकडे एखादी वस्तू असून सुध्दा गुणधर्मापासून दुरावले गेले असतो, किव्वा त्या वस्तुची अनुभूती मिळालेली नसते.बालकवीनी सृष्टीसौंदर्याची खाण आपल्या कवितेत आणली आहे.
मन पटकन हिरव्या गवतात... पिवळ्या सोनेरी उन्हात... गवताच्या पात्यात... सप्तरंगी इंद्रधनूत गुरफटून जाते.
निसर्ग सौंदर्याचा कलाविष्कार म्हणजे श्रावण महिना. हा महीना जसा सोवळ्या ओवळ्याचा तसा निसर्गाशी एकरूप होण्याचा! आरती प्रभुनी एक कवितेत
" लव लव करी पात डोळ नाही थार्याला
एक टक पाहू कस लुक लुक तार्याला "
अस साध सूटसुटीत वर्णन केलेल आहे. पण या कवितेची खोली खुप आहे. गवताच हिरव पात त्या पानावरून परावर्तीत होणारे सूर्यकिरण इतके तेजस्वी दिसतात की त्याकडे एकटक पाहता येत नाही हा साधासुधा अर्थ! पण, लवलवणार पात फ़क्त गवताच नसत, डोळ्यांच पातही लवलवतच असत. आपल्यात रमणारी आणि आपलस करू पाहणारी व्यक्ती आपल्याकडे पाहते.
आपली नि त्या व्यक्तीची नजर भेट होते. काही क्षण डोळ्याना डोळा भिडतो. आणि मग पापण्यांची फडफड सुरु होते. त्या व्यक्तीची मनातली सारी ओढ, उत्सुकता अणि संभ्रम निर्माण होतो. अणि त्या व्यक्तीकडे एकटक पहावास वाटत नाही. खुप काही घडत पण घडतच नाही. खुप सांगीतल जात, सुचवल जात, पण सुचवायचही राहून जात... असा हां मोरपंखी अनुभव! श्रावणात सगली सृष्टी खुलते अणि मनाला भावून जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा