माझी ब्लॉग सूची

शनिवार, १० जुलै, २०१०

शिवण

तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतो आपण
एखादेचसे गाने त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असेल गाणे बरेचदा रडता रडता ओठी येते
साधारणतः असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते..
आपले असे असतेच कोण? एकदोन मिठया नि चार दोन थेंब?
असेल गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणार्यानच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतल्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोड़ी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण? सगळेच असतात आपले आपले
' आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपण सुध्हा गर्दीमध्ये सहसा मरवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळी... आणिक कविता करणे वेगळे !!!
कवितादेखील असते कोण? वालुत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो'- याच्याशिवाय उरते काय?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते खरी
एकदा शिवण सुटली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असेल गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा