मैत्रीत असते आईची माया
मैत्रीत असते वडिलांची छाया
मैत्रीत असतो बहिणीचा वाद
मैत्रीत असतो संगीताचा नाद
मैत्रीत येते झुलुक वार्याची
मैत्रीत असते साथ खर्याची
मैत्रीत असतो चंदनाचा सुगंध
जसा नाजुक रेशमाचा बंध
मैत्री म्हणजेसोनेरी पिंपलपान
मैत्री म्हणजे जीवनातील मखमली रान
मैत्रीत मिळतो शिक्षकांचा मार
पण यातूनच घडतो ना सुसंस्कार!
मैत्री म्हणजे संस्कारांची शिदोरी
जसे निरागस मूल आईच्या पदरी
मैत्रीत असतात वेगलेच तरंग
जणू नभातील इंद्रधनुचे सप्तरंग
मैत्रीत नसतो कोणताच स्वार्थ
मैत्रीने मैत्री जपणे हाच तर मैत्रीचा अर्थ
Khup Changali aahe Kavita...
उत्तर द्याहटवा